पनवेल ः ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याने ओला चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय महिला रा. इंडिया बुल्स ग्रीन लॅवेंडर्स हौ. सोसायटी हिला ओला गाडीवरील चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एसटी स्टॅन्डदरम्यान घेऊन जात असताना हायवेवर एका ठिकाणी गाडी थांबवून महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केला. या बाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ओला गाडीवरील (क्र. एमएच 01 सीव्ही 8261) चालक मिराज हुसेन सिद्दीकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …