स्थायी समितीच्या सभेत 32 विषयांना मंजुरी
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या सभेत एकूण 34पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभेत एक विषय नामंजूर करण्यात आला, तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील बैठक सभागृहात घेण्यात आली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सदस्य, उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, सचिव तिलकराज खापर्डे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मागील स्थगित विषय महापालिका क्षेत्रातील (पनवेल शहर वगळता) पाणीपुरवठा परिचालनासाठी व देखभाल-दुरुस्तीकरिता मुनष्यबळ पुरविण्याच्या कामासाठी सुधारित वाढीव खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणे, पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र व उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाकरिता वाढीव खर्चास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणे, महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे टँकर भाड्याने पुरविण्याच्या कामाकरिता वाढीव खर्चास सुधारित प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळणे या विषयांना स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्रावर 320 केव्हीए क्षमतेचा डिझेल जनरेटर बसविणे, पुरविणे आणि कार्यान्वित करण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर-अतिक्रमणांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घालण्यासाठी मनपा कार्यक्षेत्रामध्ये 0.5 मी. रिझॉल्यूशन असलेली उपग्रह छायाचित्राच्या आधारे सविस्तर बेस मॅप तयार करण्याच्या कामास मे. वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजी प्रा.लि यांना मुदतवाढ मिळण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मालकीच्या मलनि:स्सारण वाहिन्या व भूमिगत गटारांची दोन वर्षांसाठी दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करणे तसेच प्रभाग समिती अ प्रभाग क्र.4मधील मुर्बी गावात मलनि:स्सारण वाहिन्या अंथरणे व पावसाळी गटारांचे बांधकाम करणे याकामी न्यूनत्तम दराची निविदा स्थायी समितीने मंजूर केली. महापालिकेमध्ये विवक्षित कामकाजास्तव नेमणूक केलेल्या सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्यांच्या सेवामुदतवाढीस मंजुरीबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मालकीचे कार्यालय, शाळा, फिश मार्केट, उद्याने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाट्यगृह, डॉ. आंबेडकर भवन, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये व शौचालये इत्यादी ठिकाणच्या विद्युत व्यवस्थेची दोन वर्षांसाठी निगा देखभाल-दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करणेकामी न्यूनतम दराची निविदा मंजूर करण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिकेच्या मालकीच्या महात्मा गांधी उद्यानातील पूर्वीची जुनी आरोग्य विभागाची हजेरी निष्काषित करणे, महापालिका क्षेत्रामध्ये दोन वर्षांकरिता पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्याकामी न्यूनतम दराच्या देकारास मान्यता देणेबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. खारघर सेक्टर 15 येथील प्लॉट क्र. 25वर उद्यान विकसित करणे, अंतर्गत विरंगुळा केंद्र बांधकाम करणे, नवीन पनवेल पूर्व सेक्टर 4 ,15 ए, 3, 5 येथील उद्याने नुतनीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिकेमध्ये ‘जीआयएस बेसड् वर्क्स् मॅनेजमेंट इंटिग्रेटेड विथ डबल एण्ट्री अकाउंटींग सिस्टम’ तीन वर्षांकरिता देखभाल-दुरुस्तीसह प्रस्थापित व कार्यान्वित करण्याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. महापालिका हद्दीतील खारघर येथील सेक्टर 20 व सेक्टर 5मधील उद्याने, कळंबोली येथील सेक्टर 12मधील उद्याने नुतनीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रभाग समिती अ, प्रभाग क्र. 3 तळोजा पाचनंद येथील तलावाचा विकास व सुशोभीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ, प्र. क्र. 1मधील पिसार्वे, तुर्भे, घोट गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बनविणेकामी स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ, प्र. क्र. 1मधील धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटार बांधणे, नागझरी, गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिकेच्या शिल्लक निधीची नव्याने मुदतठेवीत गुंतवणूक करण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ मधील प्रभाग क्र.4, खारघर येथील सेक्टर 21, भूखंड क्र.151 येथे महापौर यांचे निवासस्थान बांधण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका हद्दीत विविध ठिकाणी हजेरी बूथकरिता कंटेनर केबिन खरेदी करून बसविणे याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. महापालिका प्रभाग समिती अ,ब,क,ड हद्दीतील सिडको प्रशासनाकडून हस्तांतरित क्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत व पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करणे याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. महापालिका प्रभाग समिती ड, भूखंड क्र.13, काळुंद्रे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका क्षेत्रात पाच शि टॉयलेट खरेदी करून बसविणेकामी प्राप्त न्यूनतम दराच्या निविदेबाबत निर्णय घेण्याबाबतच्या विषय सभेत नामंजूर करण्यात आला, तर महापालिका हद्दीत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत सन 2015-2016, 2016-2017 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या, वृक्षलागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा, दुरुस्ती-देखभाल करण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने स्थगिती दिली.