Breaking News

पनवेल कबड्डी लीगमध्ये 1010 सरकार संघ विजेता

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचे रक्त सळसळत राहणार असून चांगळे खेळाडू घडणार आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेल येथील (दि. 22) शिव समर्थ प्रतिष्ठान आयोजित कबड्डी लीगवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग 2022 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 1010 सरकार या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. पनवेल शहरातील विजय सेल्स सिग्नलजवळील मैदानात शिव समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने खेळल्या गेलेल्या कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने प्रेक्षकांना थरारक सामने बघण्याचा आनंद मिळाला. स्पर्धेत किरण मुंबईकर स्पोर्ट्स या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट शुभेच्छा दिल्या तसेच येणार्‍या काळात सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. या वेळी नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, भाजप नेते महेंद्र वावेकर, स्मित पाटील, शिरीष सोनार यांच्यासह पदाधिकारी आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply