पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश संपादित केले आहे. त्याअंतर्गत देवळोली, पोसरी आणि सावळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी आणि उपसरपंचपदी भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत. त्याअंतर्गत या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी, उपसरपंच कांता कांबळे, देवळोलीच्या सरपंच काजल पाटील, पोसरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतिष पाटील, पोसरी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिद, विशाल जोशी, सावळे ग्रामपंचायत सदस्य सुनिल माळी, सतिष म्हस्कर, सुरेखा कुरंगुळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभूळकर, माजी सरपंच अविनाश गाताडे, संदीप पाटील यादव दिघे, नामदेव पाटील, भालचंद्र गव्हाणकर, योगेश पाटील, मंगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच या वेळी देवळोलीचे माजी सरपंच यादव दिघे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.