मोठा अपघात टळला
कर्जत : बातमीदार
नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यावेळी ते सिमेंटचे पिलर रेल्वे मार्गावर कोसळले असते तर मोठा अनर्थ ठरला असता. दरम्यान, त्याबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही,मात्र मध्य रेल्वे गेली अनेक दिवस तो जुना पादचारी पुलाचे पिलर तोडण्याचे काम सुरु होते.
नेरळ रेल्वे स्थानकात 2003 मध्ये पादचारी पुलाचे काम सुरु झाले,त्यासाठी स्थानकात मध्यभागी दोन्ही पबाजूला पिलर उभारले गेले होते. त्या पिलर वर टाकण्यासाठी लोखंडी प्लेट देखील नेरळ स्थानकात येऊन पडल्या होत्या. मात्र मध्य रेल्वेने त्या पादचारी पुलाचे काम थांबवून ठेवले आणि तब्बल 20 वर्षांनी ते दोन्ही पिलर काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फलाट दोन वरील पिलर गेली डिड महिना काढले जात होते. त्या पिलर चा 20 फूट उंचीचा भाला मोठ्या व्यासाचा खांब 24 मे रोजी अचानक कोसळला.त्यावेळी हा पिलर रेल्वे मार्गावर कोसळला असता तर मोठा अनर्थ घडणार होता,परंतु दैव बलवत्तर म्हणून हा पिलर ओव्हर हेड वर कोसळला आणि अनर्थ टळला आहे. दरम्यान, संभाव्य दुर्घटना घडली असती तर काय झाले असते?याचा विचार रेल्वे प्रशासनणे करण्याची गरज असून तो धोका लक्षात असून देखील खबरदारी न घेणार्या कंत्राटदार यावर कारवाई करणार आहे कि नाही? असा प्रश्न नेरळ प्रवासी संघटनेने उपस्थित केला आहे.
घटनेनंतर रेल्वे प्रशासन गप्प
अचानक कोसळलेल्या त्या पिलरबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही माहिती दिली जात नाही. त्याचवेळी तो पिलर रेल्वे मार्गावर कोसळलले असता तर मुंबईकडे आणि कर्जतकडे जाणारी सर्व वाहतूक बंद पडली असती. त्यात तो पिलर मजबूत असल्याने कदाचित ओव्हर हेड खांब कोसळल्याची आणि पूर्ण रेल्वे मार्ग बंद होण्याची देखील भीती होती. मात्र त्या दुर्घटनेबाबत मध्य रेल्वे गप्प बसल्याचे दिसून येत आहे.