Breaking News

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस उद्या मंगळवारी (दि. 19) विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे.

यामध्ये पाणपोईचे उद्घाटन, प्रभाग 19 मधील नागरिकांसाठी मोफत फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ. हांडे यांच्या हस्ते होणार आहे. हे शिबिर रोज बाजार भाजीमार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गुणे हॉस्टिटलजवळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि. 22) योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचा नोंदणी कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेविका दर्शना भोईर यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply