Breaking News

मनोरा ओपन बॅडमिंटन स्पर्धा : ’आरटीआयएससी’च्या विद्यार्थ्यांची प्रभावी कामगिरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील (आरटीआयएससी) योगेश पाटील बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मनोरा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शटलर्स आदिती यादव, हिमांशू काकड, शिवम चौरे, रिद्धिमा म्हात्रे, शांभवी सोनावने, युवराज सिंग, क्रित्या पटेल यांनी सहभाग घेतला असून शटलर क्रित्या पटेलने यू13 एकेरी गटात सुवर्णपदक जिंकले. याआधी उपांत्य फेरीत क्रित्याने त्याचा सहकारी शिवम चौरेचा पराभव केला. शिवम चौरे याने याच गटात तृतीय क्रमांक पटकावला. युवराज सिंग याने अकादमीच्या सर्वांत तरुण शटलरसह यू11 बॉईज एकेरीमध्ये तिसरे पारितोषिक जिंकले. मनोरा टूर्नामेंट ही जुनी आणि प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धा असून ज्युनियर स्तरावरील प्रतिभेवर लक्ष केंद्रीत करते.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply