Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून मान्सूपर्व कामांचा आढावा; अधिकार्‍यांना सूचना

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीत ठिकठिकाणी मान्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोयनावेळे आणि सिद्धी करवले या स्मार्ट व्हिलेजमध्ये नालेसफाईच्या कामाची तसेच गावात सुरू असलेल्या रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 28) करून आढावा घेतला, तसेच या कामांसंदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक संतोष भोईर, दिनेश केणी, युवानेते समीर कदम, रवि म्हात्रे, खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी, गोपीनाथ पाटील, संतोष मढवी, शहर अभियंता संजय कटेकर, साळुंखे, जयराम कदम, कोयनावेळेचे माजी सरपंच विनेश कदम, नरेश कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply