Breaking News

महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः प्रतिनिधी

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 30) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालय येथे महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. महिलांमध्ये आढळणार्‍या लठ्ठपणाची तपासणी, आयुर्वेदिक उपचार व आहार- विहार विषयक तज्ज्ञ डॉ. जाई केणी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 4 पर्यंत हे शिबिर होणार असून या शिबिराचा जास्तीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा व पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी केले आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply