पनवेल : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य् विभागास मिळालेल्या सूचनांनूसार रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे अपंग व दिव्यांगांच्या दाखल्यांसाठी महिन्याच्या चारही शुक्रवारी सेवा सुरू करण्यात आली आहे.
अपंग व दिव्यांगांच्या तपासणीसाठी जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येते. पनवेल महानगरपालिका व उपजिल्हा रूग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीरोच नियोजन केले जाते. यापुढील काळात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये अपंग व दिव्यांग नागरिकांस पहिल्या व तिसर्या शुक्रवारी युडीआयडी पोर्टलमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेेशन करून दाखले देण्यात येणार आहेत तर दुसर्या व तिसर्या शुक्रवारी भिषक, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत मानसिक आजार व मंदबुध्दी व्यंग 248, नेत्रव्यंग 36, पक्षघात व्यंग 09, अस्थिव्यंग 250 असे एकुण 543 पात्र लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले आहेत.
लाभार्थ्यांना आवाहन
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तसेच तालुका क्षेत्रातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन संकपाळ यांनी केले आहे.