Breaking News

वर्क फ्रॉम होममुळे घरांना मागणी

टु बीएचकेकडे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर खूपच विपरीत परिणाम झालं असून वर्क-फ्रॉम-होम संकल्पनेमुळे संभाव्य गृह खरेदीदार शहराच्या परीघावर म्हणजेच नवी मुंबई, ठाणे वसईत विरार  मोठी घरे विकत घेऊन शहराच्या जवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, ऐरोली, तळोजा, वाशी, कामोठे आणि नेरूळ या ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिली गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल आता टु बीएच के कडे वळला असल्याचे निरीक्षण एलिसियम कॅपिटल अडवाईजरीतर्फे करण्यात आले आहे.

ठाण्यात, घोडबंदर रोड आणि डोंबिवली यांसारख्या परिसरांना कनेक्टिव्हिटी, चांगल्या सुविधा आणि रोजगाराच्या केंद्रांशी जवळीक असणार्‍या घटकांमुळे प्राधान्य आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना एलीसियम कॅपिटल अडवाईजरीचे संस्थापक सुभाष उधवानी सांगतात, वर्क फ्रॉम होम म्हणजेच  घरून काम करण्यातली अडचण म्हणजे बहुतेकांची घरे लहान असतात. घरात लहान मुले, वृद्ध माणसे असतात. घरून काम करणारी माणसे एखादी खोली अडवून बसली, त्यांचे कॉन्फरन्स कॉल सुरू झाले की इतरांच्या हालचालींवर मर्यादा येतात. घराच्या परिसरात बांधकामे, दुरूस्तीची काम सुरू असतात. वाहनांची ये-जा सुरू असते. या सगळ्याचे खूप आवाज येत असतात, यामुळे वर्क फ्रॉम होम करणार्‍या नागरिकांना अनेक समस्या होतात. गेल्या तिमाहीत आम्ही केलेल्या निरीक्षणानुसार मुंबई व लगतच्या शहरांमध्ये टु बीएच के घरांच्या मागणीत वाढ झाली आहे.

मुंबई व लगतच्या शहरांमध्ये सुरू केलेल्या नवीन गृह प्रकल्पाच्या नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये टू बीएचके असलेल्या घरांचे प्रमाण जास्त आहे. एकूण प्रकल्पांपैकी 62 टक्के घरे ही टू बीएचके स्वरूपातली आहेत. त्यानंतर थ्री बीएचके घरांचा वाटा जवळपास 19 टक्के आहे. वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे मोठ्या घरांच्या मागणीत वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ही मागणी लक्षात घेऊन विकासकांकडूनही मोठी घरे बांधण्याला प्राधान्य दिले जात आहे. कोरोना महामारी नंतर वर्क फ्रॉम होम या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले असून भारतात काम करणार्‍या पाश्चिमात्य कंपन्या वर्क फ्रॉम होम हि संकल्पना आजही राबवित असल्यामुळे टु बीच के घरांच्या मागणीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 34 टक्के वाढ

कोरोना काळात स्वतःच्या मालकीच्या घरांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे स्वतःचे घर घेण्यासाठी खरेदीदारांमध्ये धडपड पहायला मिळत आहे. परवडणार्‍या घरांचा मुद्दा बाजूला ठेवला तर स्वतःच्या मालकीचे घर घेण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. 2022च्या पहिल्या तिमाहीत नवी मुंबईने टू बीएचकेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. प्रॉप्सस्टॅक या संस्थेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबईतील स्थावर मालमत्ता बाजारपेठेत 11745 कोटीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा त्यात 34 टक्के वाढ झाली आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply