Breaking News

कर्जत तालुक्यासाठी सहा जि.प. गट; पंचायत समितीचे 12 गण

प्रभाग रचना जाहीर : निवडणुकीचे बिगुल वाजले

कर्जत : बातमीदार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या 12 गणांची रचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेला आक्षेप असल्यास 8 जूनपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मार्च 2022मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य मंडळाची मुदत संपली आहे. तसेच कर्जत पंचायत समितीच्या सदस्य मंडळाची मुदतदेखील त्याच महिन्यात संपली आहे. मात्र ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्य नायायालयाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून राबविण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 66 आणि 15 तालुक्यातील तालुका पंचायत समितीच्या 132 जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 2) रोजी रायगड जिल्हाधिकारी यांनी नमुना प्रभाग रचना जाहीर केली आहे. कर्जत तालुक्यात पूर्वी  प्रमाणे जिल्हा परिषदेचे सहा गट असणार आहेत तर कर्जत पंचायत समितीचे बारा गण असणार आहेत. कर्जत तालुक्यात गट आणि गण यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्या-त्या गटातील ग्रामपंचायती या देखील कायम असून कोणताही बदल 2017च्या सार्वत्रिक निवडणुका आणि होऊ घातलेल्या निवडणुका यांच्यातील प्रभागात झालेला नाही.  कर्जत तालुक्यात 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे कळंब, पाथरज, उमरोली, नेरळ, सावेळे आणि बीड बुद्रुक असे सहा गट कायम ठेवण्यात आले आहेत. तर त्या गटामधील समाविष्ट ग्रामपंचायती यादेखील कायम आहेत. तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून त्या आगामी जि. प. आणि पं. स. निवडणुकीसाठी 2017 प्रमाणे त्या-त्या गटात कायम ठेवण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील पं. स. गण या प्रमाणे

तालुक्यात कळंब, पोशीर, पाथराज, कशेळे, दहिवली तर्फे वरेडी, उमरोली, नेरळ, शेलू, पिंपळोली, सावेळे, वेणगाव आणि बीड बुद्रुक असे 12 गण असणार आहेत. नमुना प्रभाग रचनेच्या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply