पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) नव्या 294 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 413 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 165 व ग्रामीण 33) तालुक्यातील 198, अलिबाग 23, पेण 15, उरण 13, कर्जत 12, महाड 10, माणगाव नऊ, रोहा आठ, खालापूर चार आणि श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा एक, ग्रामीण एक) तालुक्यात दोन, कर्जत, अलिबाग, महाड तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 50,260 आणि मृतांची संख्या 1422 झाली आहे. जिल्ह्यात 45,643 जण कोरोनामुक्त झाल्याने 3195 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper