Breaking News

रोहा सिटीझन फोरम आयोजित नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद; 141 रुग्णांनी केली तपासणी

धाटाव : प्रतिनिधी

रोह्यातील सामाजिक संस्था रोहा तालुका सिटीझन फोरम ट्रस्ट आणि नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने गुरुवार (दि. 2) रोजी  आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 43 जणांना मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. रोहा येथील श्री धावीर देवस्थानाच्या प्रांगणात आयोजित या शिबिराच्या प्रारंभी काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख,  दिलीप वडके, श्रीकांत ओक, अ‍ॅड मनोजकुमार शिंदे, महेश सरदार, राजेंद्र जाधव, संदीप सरफळे, इल्यास डबीर, निलेश शिर्के, अमोल देशमुख, सचिन शेडगे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. या शिबिरास माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, उस्मान रोहेकर,  विजय देसाई, शैलेश रावकर, राजेश काफरे, परशुराम चव्हाण, भरत गुरव आदींसह तालुक्यातील अधिकारी वर्ग व रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. वामसी कृष्णा, फॅबिना फर्नांडिस, गायत्री चौरसिया, अंजू पाल, लवप्रीत कौर, नरेश आवलर यांनी तपासणी काम पाहिले, तर रोहा सिटीझन फोरमचे दिनेश जाधव, भावेश अग्रवाल, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर यांच्यासह आशा सेविका संजिवनी संजय चाळके, मंथना प्रफुल्ल झुरे, सिमरन सदानंद कडव, नलिनी नंदकुमार सावंत, सुप्रिया दिपक बठारे, प्रज्ञा लहाने, दिप्ती गुडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणार्‍या सर्वांचे आभार मानले आहेत. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply