Breaking News

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल भाजप कार्यालयात रविवारी (दि. 6) उत्तर रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मंडल पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.

प्रत्येक मंडलात कार्यक्रम करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आणि नेमके काय करायचे याची माहिती देत भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी आणि अनुसूचित मोर्चा जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

या वेळी उपाध्यक्ष अरुण सोळंकी, सरचिटणीस अमित जाधव, प्रभाकर पवार, चिटणीस वसंत पवार, हिमंतराव मोरे, वसंतराव जाधव, ललिता इनकर, सीमा खडसे, संदीप तुपे, श्याम साळवी, अनिल साबणे, अमोल जाधव, प्रवीण सावंत, गजेंद्र जीगे, विक्रम अढवाल, सूरज हातेकर, किशोर जाधव, विपुल सावंत आदी रायगड जिल्ह्यातील  पदाधिकारी व मंडल पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply