शाळा समिती अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
गव्हाण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2021मध्ये प्रविष्ट होणार्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य आणि विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे नियमांचे पालन करुन ज्ञानार्जन करावे, अशा सूचना केल्या. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाने बहरलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचवावा, असे प्रतिपादन केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने कै. जनार्दन आत्माराम भगत यांच्या नावाने दिली जाणारी पारितोषिके तसेच अरुणशेठ भगत यांच्या वतीने कै. भिमाबाई जगन्नाथ भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुपये पन्नास हजाराच्या व्याजातून उपलब्ध होणार्या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यापुढे पारितोषिकांचे स्वरूप अधिक व्यापक करून अधिकाधिक पारितोषिके विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावीत यासाठी आणखी पन्नास हजार रुपये कायम ठेव ठेवण्याची घोषणा अरुणशेठ भगत यांनी केली.
या समारंभास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख तसेच हेमंत ठाकूर, अमर म्हात्रे, गणेश पाटील, अश्वित नाईक, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, मदन पाटील, सुधीर ठाकूर, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, मोरु नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या गोळे तसेच इयत्ता अकरावीचे विद्यार्थी, पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि सर्व सेवक उपस्थित होते.
ग्रामपंचायतच्या वतीने विद्यालयासाठी व परिसरातील अनेक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर असणारे ग्रामपंचायत सेवक सुजित ठाकूर व प्राथमिक आरोग्य केंद्र सेवक प्रवीण कोळी यांचाही सन्मान करण्यात आला.
पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून अनेक समाज सेवी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी आणि नागरिकांच्या शासकीय दाखल्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासकीय दाखला शिबिराचे आयोजन विद्यालयामध्ये 12 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आल्याची माहिती जि. प. सदस्य राजेंद्र पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले तर संस्थेचे लाईफ मेंबर, समन्वय समिती सदस्य व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांनी आभार व्यक्त केले.