Breaking News

शांतिवन येथे रंगला अनोखा माती उत्सव

पनवेल : वार्ताहर

कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित स्नेहलता निसर्गोपचार केंद्रात माती उत्सव साजरा करण्यात आला. वाशी, नवी मुंबई येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे डॉ. जगदीश नायक व मुंबईचे डॉ. कौस्तुभ साळवी यांच्या संकल्पनेतून माती उत्सवाचे आयोजन शांतिवन पनवेल निसर्गोपचार शास्त्रानुसार उन्हाळ्यातील गर्मी व शरीरांतर्गत सूज कमी करण्यास योग्य माती लेप किंवा मड बाथ  या उपचाराने अनेक फायदे कसे होतात या बाबत माहिती देऊन प्रत्यक्ष उपचार करण्यात आले. याचबरोबर गायीच्या गोमुत्राचा निसर्गोपचार शास्त्रानुसार उपचारासाठी कसा वापर होतो याची माहिती डॉ. साळवी ह्यांनी दिली. शिबिराची सुरुवात सकाळी 7 वाजता झाली. प्रथम शरीर शुध्दीसाठी कटी स्थान, एनिमा, मसाज हे उपचार डॉ. विजया यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. त्यानंतर सर्वांना मड डान्स करायला शिकविले. झुम्बा डान्स ट्रेनर डॉ. राधा यांनी चिखलात नृत्य करून घेतले. दुपारी निसर्गोपचार पध्दतीचे जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी शांतिवन संस्थेतील वृध्दाश्रम, आधारघर, विणकाम, शेती, प्रशिक्षण केंद्र असे अनेक उपक्रम पाहिले. अशा प्रकारे एका दिवसात अनेक ध्येय साध्य करण्यात शिबिरार्थींना यश मिळाले. पहिले म्हणजे शरीर शुध्दी, माती लेप व गो उपचाराने पुढे येणारे आजार टाळता येतात. दुसरे शांतिवन संस्थेत वृक्षारोपण केले. तिसरे शांतिवनातील विविध उपक्रम पाहून त्यांना मदत केली. तसेच रुग्णाचे व कार्यकर्त्यांचे उत्साह वर्धन केले. शिबिरार्थी व इतरांचे उत्साह पाहून स्वामी विवेकानंद योगा केंद्रांनी पुन्हा एकदा मड फेस्ट 2चे आयोजन शांतिवन संस्थेतील स्नेहलता निसर्गोपचार येथे  करत आहे. हा माती उत्सव सगळ्यांसाठी खुला आहे. या माती उत्सव उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉ. कौस्तुभ साळवी  (9821196677), डॉ. जगदीश नायक (7506608033) यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply