रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या स्व. नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 2) श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनीही रक्तदान केले.

पनवेल महापालिकेच्या स्व. नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांना जाऊन तीन वर्षे पूर्ण झाली. त्यांचे पुण्यस्मरण होईल या हेतूने जनहित संवर्धक मंडळ, कच्छ युवक संघ, युवानाद, रुधिरसेतू, सन्मित्र मंडळ, श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळ पनवेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जीवनामध्ये प्रथमच रक्तदान केलेल्या अश्या 21 रक्तदात्यांना प्रोत्साहनपर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच नेत्र तपासणीही करण्यात आली असून याचा 100 जणांनी लाभ घेतला.

या वेळी माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, भाजपचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, वर्षा प्रशांत ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, नंदा ओझे, अमित ओझे, प्रिती धुपाटे, उद्योजक राजू गुप्ते, गुरुनाथ लोंढे, सुनिता खरे, अक्षया चितळे, अंजली इनामदार, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply