Breaking News

24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने 24 जून या ‘दिबांं’च्या स्मृतिदिनी सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे.
गेल्या दोन दिवसांत कामोठे, रोडपाली, कळंबोली, आसूडगाव, पडघे, पाले खुर्द येथे बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply