Breaking News

काशिद समुद्रात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पुणे येथील पिंपरी चिंचवड भागातील एका 29 वर्षीय तरुणाचा बुधवारी (दि. 8) समुद्रात पोहताना बुडाल्याची घटना घडली.
काशीद समुद्रकिनारी फिरता फिरता पिंपरी चिंचवड भागातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. पोहता पोहता यातील सनी अँथूनी पॉवेल वय 29 हा पोहता पोहता खोल समुद्रात वाहून गेला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या सहकार्‍यांनी केला, परंतु तो खूप दूरवर गेल्याने त्याला वाचवणे खूप किचकट होऊन बसले. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा तपास मुरूड पोलीस करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply