Breaking News

खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; मास्टरमाईंड लिग स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मास्टरमाईंड लिग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैंकी 73 विद्यार्थ्यांनी ए प्लस मिळवत विजयी झाले असून, त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 8) सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.  मास्टरमाइंड ही 12 वर्षे जुनी संस्था आहे. जी विद्यार्थ्यांमधील कौशल्ये, चारित्र्य विकास आणि शैक्षणिक अनुभव वाढवण्यसाठी काम करते या संस्थेमार्फत नुकतीच शाळास्तरीय मास्टर माइंड लिग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मधील 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधील 222 विद्यार्थी हे राज्य स्तरीय मास्टर माइंड लिग स्पर्धेसाठी तर 73 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर 73 विद्यार्थी जे विजयी झाले आहेत त्यांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी स्कूलमध्ये झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला तसेच पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रृघ्न काकाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply