Breaking News

खांदा कॉलनीत भाजपतर्फे महिला बचत गटांना योजनांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केली आहे. या कालावधीत सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यत्त पोहचाव्यात याकरीता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरिबकल्याणपर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीमधील भाजपच्या कार्यालयात महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती बुधवारी (दि. 8) देण्यात आली.
खांदा कॉलनीमधील सेक्टर 1 येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सेवा सुशासन आणि गरिबकल्याणपर्व कार्यक्रम बुधबारी राबवण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत समाजातील वंचित घटक व शहरी भागातील गरीब लोकांची भेट घेण्यात आली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने यशस्वीपणे आठ वर्ष पुर्ण केल्यानिमित्त राबवण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शैाचालये, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य, उज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन तसेच ई- श्रमीक कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांची माहिती तसेच महिला बचत गटांना पंतप्रधान मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनाची माहिती देण्यात आली. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारूशीला घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, नीता माळी, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे, खजिनदार आदिती मराठे, स्नेहल खरे, नीता मंजुळे, अंजली इनामदार, सानिका इंदुलकर, मनीषा पाटील, संध्या जाधव, प्रेमा भोपी, सोनाली सावंत, शैला मोरे, सीमा निकम, मनीषा कोळी, सुनीता चव्हाण, सविता खराते, अरुणा खरात, माधुरी अवचटकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply