Breaking News

रसायनीतील माजी विद्यार्थ्यांची तीस वर्षांनंतर भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनीतील गुळसुंदे येथील तुंगारतन विद्यालयातील 1991-1992 दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बामणोली धरणातील आईं गावदेवी उसराई देवीच्या मंदिराच्या सभामंडपात उत्साहात पार पडला. यावेळी शाळेला मदत करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतल्याचे धनाजी पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी करत चर्चेंत सहभागी झाले. आपल्या तीस वर्षांतील काही माहिती एकमेकांना सांगितली. तीस वर्षांनंतर भेट झाल्यामुळे सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. यावेळी शालेय जिवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. यावेळी नारायण पाटील, धनाजी पाटील, संजय माने, सुनील सावंत, इंदू माळी, वासंती पवार,चांगुणा केदारी, दत्ता माळी, राजेश पाटील, महेंद्र पैलनेकर, अनिल माळी, सुरेश पवार, समीर धुमाळ, भालचंद्र म्हस्कर, निळकंठ भोईर, हनुमान माळी, भास्कर म्हस्कर, विष्णू मेढेकर,भरत पाटील, सुनील गोडीवले, राजेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे करुन स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाने सांगता झाली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply