Breaking News

‘आदर्श’च्या रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन

अलिबाग : प्रतिनिधी

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष  सुरेश पाटील यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्ताने व चेंढरे शाखा 16  व्या वर्धापन दिनानिमित्त  आदर्श भवन येथे बुधवारी (दि. 8) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याला रक्तदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरात 54 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै.काका ओसवाल यांच्या स्मरणार्थ  आदर्श पतसंस्थेच्या अलिबाग शाखे बाहेर  पाणपोई सुरु करण्यात आली. बुधवारी  या पाणपोईचे उद्घाटन कै.काका ओसवाल यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला जैन, पुत्र रणजीत जैन व कुटुंबियांच्या उपस्थितीत करण्यात आले.  या पाणपोईमध्ये थंडगार पाणी आणि आरओ तसेच युव्ही  वापरून शुद्ध पाणी वितरित केले जाणार आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, विजय पटेल, अभिजित पाटील, अ‍ॅड.आत्माराम काटकर, जगदीश पाटील, अ‍ॅड.वर्षा शेठ, अ‍ॅड.रेश्मा पाटील  विलाप सरतांडेल, सुरेश गावंड, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी पाटील, सल्लागार नितिन वाणी आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply