Breaking News

इन्फोसिसने तीन दशकांत दिला भरभरून परतावा

14 जून रोजी इन्फोसिसच्या शेअर बाजारातील नोंदणीस 29 वर्षं होत आहेत आणि या 29 वर्षांत कंपनीनं 16 हजार पटींपेक्षा जास्त परतावा दिलेला आहे,  साधारणपणे 6300 रु. भांडवलावर सुरु झालेली ही कंपनी आज सुमारे सव्वा लाख कोटी वार्षिक उत्पन्न असलेली कंपनी ठरली आहे. त्यानिमित्तानं..

दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट एकदा म्हणाले होते,  कायमस्वरूपी गुंतवणूक करण्याच्या विचारानंच शेअर्स खरेदी करा. ही गोष्ट इन्फोसिस कंपनीच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसते. 14 जून रोजी इन्फोसिसच्या शेअर बाजारातील नोंदणीस 29 वर्षं होत आहेत आणि या 29 वर्षांत कंपनीनं 16 हजार पटींपेक्षा जास्त परतावा दिलेला आहे. या कंपनीच्या आयपीओ मधील 1 शेअर्सचे 1024 शेअर्स झालेले आहेत व एका शेअरचा भाव आज 1500 रुपये आहे. म्हणजेच 1024ु 1500=15,36,000.  आज ही कंपनी 1500 रुपयांवर शेअर बाजारात व्यवहार होताना दिसते जिचा उच्चांकी भाव 1953 रुपयांवर गेलेला होता. आजच्या घडीस ही कंपनी भारतीय शेअरबाजारातील बाजारमूल्याप्रमाणं चौथ्या नंबरवर असून तिचं बाजार मूल्य हे सहा लाख कोटी रुपयांवर आहे.

1995 साली मला इन्फोसिस या कंपनीची तोंड ओळख झाली व त्या कंपनीबद्दल, खरं तर तिच्या संस्थापकांबद्दल एक आदर वाटू लागला. आमच्याकडं पेईंग गेस्ट म्हणून राहणारे श्री.घनश्याम वागळे यांची इन्फोसिसच्या पुण्यातील सेव्हन लव्हज चौकातील वर्धमान बिल्डिंगमधील ऑफिसात सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती झालेली होती व त्यांच्याकडूनच मला इन्फोसिसबद्दल ऐकायला मिळायचं.

2 जुलै 1981 मध्ये श्री.नारायण मूर्तीं यांनी 6 अभियंत्यांना बरोबर घेऊन केवळ 250 अमेरिकी डॉलर भांडवलावर इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रा.लि. या नावानं पुण्यात कंपनी चालू केली. नंतर 1983 साली कंपनीचं ऑफिस हे बेंगलोरला (आताचं बंगळुरू) हलवले. फेब्रुवारी 1993 मध्ये इन्फोसिसच्या प्राथमिक समभाग विक्रीचा प्रस्ताव (खझज) आला. त्याची ऑफर प्राईस ही रु.95 होती व आश्चर्याची बाब म्हणजे तो आयपीओ पूर्ण भरला गेला नव्हता. त्यामुळं अमेरिकेच्या मॉर्गन स्टॅन्ले या कंपनीनं 13% शेअर्स खरेदी केल्यामुळं तो आयपीओ यशस्वी (पूर्ण सबस्क्राईब) झाला. मग 14 जून 1993 रोजी इन्फोसिसच्या शेअर्सची नोंदणी (लिस्टिंग) 145 रुपयांवर झाली. तब्बल 53% वरती. मग 1999 साली इन्फोसिसची अमेरिकन डिपॉझिटरी रिसिटद्वारे नॅसडॅक एक्स्चेंजवर नोंदणी झाली. 250 अमेरिकन डॉलरनी चालू झालेली कंपनी 2021 या आर्थिक वर्षाच्या शेवटास 121641 कोटी रुपये महसूल असलेली कंपनी झालीय. आता पाहूयात या कंपनीनं गुंतवणूकदारांना काय दिलंय ?

कंपनीनं 1994 साली एकावर एक बोनस दिला, नंतर 1997 व 1999 मध्ये पुन्हा एका शेअर वर एक शेअर बोनस. म्हणजे सुरुवातीच्या एका शेअरचे झाले 8 शेअर्स. मग 2000 साली कंपनीच्या शेअर्सचं विभाजन झालं म्हणजे 10 रु. दर्शनी किंमत होती त्याऐवजी 5 रु. ही दर्शनी किंमत झाली, त्यामुळं 8 शेअर्सचे झाले 16 शेअर्स. नंतर 2004 मध्ये कंपनीनं 3:1 म्हणजे एका शेअरवर तीन शेअर्स बोनस दिले त्यामुळं 16 चे झाले 64 शेअर्स. परत 2006, 2014, 2015 व सप्टेंबर 2018 मध्ये कंपनीनं एकास एक बोनस दिला  म्हणजे 64 शेअर्सचे झाले 1024 शेअर्स.

यावरून एक विनोदी कथा जन्म घेते.. 1993 साली आपल्या पाल्याच्या ऍडमिशनसाठी डोनेशन न देता त्याच 10000 रुपयांचे इन्फोसिसचे आयपीओ मध्ये 100 शेअर्स घेतले असते (शेअर्स लागले असते का नाही हा प्रश्नच नाही कारण आयपीओ पूर्ण भरला गेला नव्हता) तर आज त्याच 10000 रुपयांचे 15 कोटी 51 लाख रुपये झाले असते (9 जूनचा बंद भाव रु.1515 लक्षात घेऊन) ते सुद्धा लाभांशापोटी मिळालेली रक्कम सोडून.. याउलट हेच 10000 रुपये 1993 मध्ये एखाद्या कॉम्प्युटर कोर्ससाठी फी म्हणून भरून  नंतर इन्फोसिसमध्येच काम करणार्‍या अभियंत्यास अगदी पंचवीस वर्षांत आपली पुंजी साडेपंधरा कोटी नक्कीच करता आली नसती.  ही गोष्ट नक्कीच सर्व बाजूंनी विचारात पाडणारी आहे त्यामुळं मुलांच्या भवितव्याबाबत विचार करताना त्यांच्या शिक्षणावर होणार्‍या खर्चाव्यतिरिक्त त्यांच्यासाठी आपण काय व कशात गुंतवणूक केलीय हे विचारात घेणं क्रमप्राप्तच आहे. इथं गुंतवणूकगुरु वॉरेन बफे यांचं एक वाक्य नमूद करावंसं वाटतं ‘Buy it thinking you will hold it forever.’   कायमस्वरूपी गुंतवणूक करण्याच्या विचारानंच खरेदी करा.

महत्वपूर्ण डिजिटल व्यापकतेसह मोठ्या उद्योगांची सुरक्षा-परिपक्वता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या गंभीर पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी इन्फोसिसनं Palo -lto Networks या जागतिक सायबर सुरक्षा लीडरशी दोनच आठवड्यांपूर्वी करार केला आहे. तर दोनच दिवसांपूर्वी कंपनीनं जर्मनीतील डसेलडॉर्फ येथील जगातील आघाडीच्या लिफ्ट कंपन्यांपैकी एक असलेल्या ढघ लिफ्टसोबत जागतिक धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली. पुन्हा सांगावंसं वाटतं की ज्या कंपनीवर, तिच्या व्यवसायावर आपण विश्वास दाखवू शकतो व ज्या कंपन्यांचा व्यवसाय आपणास सद्सदविवेकबुद्धीनं भावतो/पटतो अशाच कंपन्या आपण गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं निवडाव्या. कोणत्याही उत्पादनात आतमध्ये काय घटक आहेत हे वेष्टणावर छापलेल्या शब्दांमुळं आपणांस कळतं व त्यावर आपण विश्वास देखील ठेवतो. उदा. नेस्ले कंपनीच्या दुधाच्या पावडर सोबत अजून काही भेसळ नाही ना ? डाबरच्या टूथपेस्टमध्ये घातलेले सगळे घटक खरंच आपल्या दातांसाठी गरजेचे आहेत का ? विम सोप मध्ये खरंच लिंबूरस मिसळलेला असतो का ? इ. मग प्रश्न आहे की जर त्या (कंपनीच्या) वेष्टणावर किंवा त्यांच्या जाहिरातींवर विश्वास दाखवून आपण ती उत्पादनं खरेदी करतो मग तितकाच विश्वास व संयम आपण त्या कंपन्यांबद्दल का नाही दाखवू शकत ? असो, ज्याचा त्याचा प्रश्न.

आज सुमारे चार दशकानंतर देखील ही कंपनी आपलं आयटी व्यसायात अढळ स्थान टिकवून आहे.  जरी आज हा शेअर आपल्या उच्चांकापासून सुमारे 25 टक्के खाली आलेला असला तरी आजच्या भावानुसार मागील 5 वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी सव्वातीनपट परतावा दिलेला दिसतो. त्यामुळं असा अढळ परतावा देणारा मल्टिबॅगर आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसल्यासच नवल..

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply