पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 479 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 25) झाली, तर दिवसभरात 632 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 299, अलिबाग 53, उरण व पेण प्रत्येकी 20, माणगाव 18, कर्जत 15, खालापूर व पोलादपूर प्रत्येकी 14, रोहा 13, महाड सहा, तळा तीन, मुरूड दोन आणि श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात चार, उरण, खालापूर व अलिबाग प्रत्येकी दोन आणि सुधागड तालुक्यात एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 44 हजार 84 आणि मृतांची संख्या 1193 झाली आहे. जिल्ह्यात 38 हजार 30 जण कोरोनामुक्त झाल्याने 4861 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper