उरण : वार्ताहर
उरणमध्ये प्रथमच तनिष्क ज्वेलर्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्वेलरी ब्रँडचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 29, 30, 31 जानेवारीदरम्यान असलेले हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उरण येथील आनंदी हॉटेल येथे खुले आहे.
तनिष्कचे नामांत कीत अतिशय सुंदर आणि सुबक सोन्याचे दागिने 18 कॉरेट 22 कॉरेटचे दागिने तसेच भारतातील नामांतकीत हिर्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पारंपारिक तसेच मॉर्डन ज्वेलर्सचे एक अनोखे दालन उरण वासियांसाठी प्रथमच तनिष्कने उपलब्ध करून दिले आहे.
भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी स्टोअर्सने उरणमधील या प्रदर्शनातील दागिन्यांच्या मजुरीवर सूट जाहीर केली आहे. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तनिष्कचे स्टोअर मेनेजर महेश देशमुख यांनी केले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटना वेळी उरण्च्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, सामाजिक कार्यकर्ते महेश म्हात्रे, सदस्या दमयंती म्हात्रे, करंजा ग्रामपंचायत सदस्या प्रमिला म्हात्रे, जानवी पंडीत, स्नेहल कासारे, आशा शेलार, रजनी कोळी, तनिष्कचे स्टोअर मेनेजर महेश देशमुख आदींसह कर्मचारी उपस्थित होते.