Breaking News

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून बी+ श्रेणी आणि 2.69 सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.
नॅक तपासणी पथकाने नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली. या समितीमध्ये अध्यक्ष प्रा. अशोक पाटील (कुलगुरू, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अ‍ॅण्ड रिसर्च इन लॉ, रांची), समन्वयक प्रा. सुधांशु रंजन मोहोपात्रा (प्राध्यापक, विधी विभाग, गुरू घासीदास विश्वविद्यालय, छत्तीसगड) आणि सदस्य डॉ. रजनी धिंग्रा (प्राचार्य, महाराजा अग्रसेन व्यवस्थापन संस्था, पश्चिम दिल्ली) यांचा समावेश होता.
नॅक तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाला अर्थात प्रशासकीय कार्यालय, ग्रंथालय, परीक्षा कार्यालय, मूट कोर्ट, डीएलएलई कार्यालय, विधी सहाय्य केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग येथे भेट देत संबंधित विभागप्रमुखांशी संवाद साधला आणि महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीवर अहवाल तयार केला, जो नॅक पोर्टलवर अपलोड करण्यात आला.
नॅक समिती सात निकषांच्या आधारे उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता प्रदान करते.
मूल्यमापन निकषांमध्ये अभ्यासक्रमाचे पैलू; अध्यापन-शिक्षण आणि मूल्यमापन; संशोधन, नवकल्पना आणि विस्तार; पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने; विद्यार्थी समर्थन आणि प्रगती; प्रशासन आणि व्यवस्थापन; मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती या संदर्भात तपासणी पथकाने कॉलेजच्या एकूण कामकाज व व्यवस्थापनाचे मूल्यांकन केले आणि 2.69च्या सीजीपीएसह बी+ श्रेणी प्रदान केली.
भेटीदरम्यान नॅक तपासणी पथकाने व्यवस्थापन सदस्य, शिक्षण कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली. तपासणी पथकाच्या सदस्यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा पुरवल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. महाविद्यालयाने दिलेले उत्तम विधी शिक्षण पाहून पथक खूप प्रभावित झाले आणि रायगड जिल्ह्यातील सर्वोत्तम विधी महाविद्यालय म्हणून उल्लेख केला. निष्कर्षात तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आणि विकासासाठी सूचना दिल्या. पथकाने दिलेल्या सूचनांच्या आधारे महाविद्यालयाने अतिरिक्त सुधारणा करण्यासाठी आणि पुढील नॅक प्रमाणन चक्रात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी पदक्रम घेण्याच्या योजना केल्या.
नॅक मानांकन महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि निर्धारित गुणवत्ता मानकांचे पालन करण्यासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नेतृत्वाखाली भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यासाठी चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे यांचे आदर्श नेतृत्व आणि शैक्षणिक प्रगतीबद्दलची निष्ठा यांना विशेष श्रेय आहे.
प्राचार्य सानवी देशमुख, आयक्ुयसी समन्वयक राघव शर्मा आणि भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या संपूर्ण प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदने ठरवलेल्या निर्धारित निकषांचे पालन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी समग्र शिक्षण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले या विषयी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था व पालकवर्गाने महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले.

Check Also

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष …

Leave a Reply