Breaking News

नवी मुंबईत हॅपी स्ट्रीट उत्साहात

शिवराज्याभिषेक ठरला आकर्षक

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार

आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, हॅपी स्ट्रीट  सारखे पहाटे तसेच नयनरम्य वातावरणात होणारे कायर्क्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन वर्षे निर्बंध असल्यामुळे घेण्यात आले नव्हते. तसेच नवी मुंबईकरांचे व लहान मुलांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांचे जीवन तणावमुक्त व्हावे याकरिता योगसाधना, चित्रकला, सायकलिंग, मोकळ्या रस्त्यावर स्केटिंग, हस्तकला, झुंबा, योगासने  असे विविध कार्यक्रमाची रेलचेल  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  नवी मुंबईकरांना पहावयास मिळाली. विशेषतः आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जो पामबीच येथे  शिवराज्याभिषेक सोहळा झाला तो नवी मुंबईकरांसाठी आकर्षित ठरला.

नवी मुंबई मनपाच्या वतीने स्वच्छता अभियान व आरोग्य विभागाकडून मलेरिया, डेंगू यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा अनेक आरोग्यविषयावर माहिती देण्यात आली. तसेच मनराव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जे मुकबधीर, कर्णबधीर, अपंग मुला-मुलींने दिलेले पर्यावरणाविषयी संदेश झाडे लावा, झाडे जगवा, जल है तो कल है व पर्यावरणाचा समतोल कसा राहिला असे अनेक पर्यावरणाला उपयुक्त ठरतील, असे संदेश या मनराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आले.

या वेळी माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, पांडुरंग आमले, जगन्नाथ  जगताप, राजू तिकोने, विनायक गिरी तसेच अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply