पनवेल : रायगड जिल्ह्यात तब्बल 670 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 2) झाली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याचा जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. दुसरीकडे दिवसभरात 477 जण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 91, रोहा 53, माणगाव 49, उरण 31, खालापूर 30, पेण 29, कर्जत 21, सुधागड 19, महाड 16, मुरूड व श्रीवर्धन प्रत्येकी सात, तळा सहा, पोलादपूर तीन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात आठ आणि पेण, अलिबाग, माणगाव, रोहा व सुधागड तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 28,702 व मृतांची संख्या 839 झाली आहे. जिल्ह्यात 23,929 जण कोरोनामुक्त झाल्याने 3934 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper