नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील विविध राज्यांतील, कन्याकुमारी ते जम्मू आणि अमृतसर ते आसामपर्यंतच्या राज्यातील भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या प्रतिनिधींचा मेळावा नुकताच दिल्ली येथे झाला. तेलंगणचे रामलू सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते. या मेळाव्यात नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी करून त्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला, तसेच समाज्याच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दोन लाखांची भव्य जनसभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लवणकार (आगरी) समाज्याच्या सर्वांगीण विकासाच्या 21 मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारला दिले आहे, त्याचा पाठपुरावा करणे, या निवेदनात पहिली मागणी, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही आहे. लोकशाही व्यवस्थेत आपल्या समाजाचे शक्ती प्रदर्शन करणे, आपल्या मागण्यांसाठी केंद्रस्थानी बसलेल्या सत्ताधार्यांच्या कानी आवाज उठवणे व त्या मान्य करुन घेणे,समाजाचा पौराणिक असा गौरवशाली इतिहास देशासमोर प्रस्तूत करणे, या उद्देशाने ही दोन लाखांची जनसभा घेण्यात येणार असल्याचे नवी दिल्ली संयोजक कृष्णकुमार भारती यांनी सांगितले.
या मेळाव्यास श्री श्री जगद्गुरु पुरुषोत्तम आनंदपुरीजी महास्वामी, कर्नाटक, महाराष्ट्रातून अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, भिवंडी आगरी समाजाचे अध्यक्ष अरुण पाटील उपस्थित होते. तर उत्तर प्रदेशातून दिलीपसिंग चव्हाण, जगदीशसिंह चव्हाण, हरियाणा, गिरी परमा, आंध्र प्रदेश, रेणुका, कर्नाटक, सिसोदिया, हरयाणा, के.एल.चव्हाण, उत्तर प्रदेश, अॅड. कुमार पाटील, महाराष्ट्र,मनोजकुमार चव्हाण, दिल्ली, यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. मेळाव्यास 21 राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …