Breaking News

राज्यपालांच्या हस्ते आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान होणार आहे. दै. शिवनेरच्या वतीने होणार्‍या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दै. शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत सहभागी होऊन गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करणार्‍या व अधिकाधिक रक्त संकलित करणार्‍या पहिल्या तीन गणेशोत्सव मंडळांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply