Breaking News

पनवेलमध्ये क्रिकेट खेळाडूंसाठी टर्फ मैदानाची उभारणी

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
खेळाडूंचे क्रिडा कौशल्य आणखी वाढावे तसेच त्यांच्या कला गुणांना वावा मिळावा या करीता पनवेलमध्ये अनेक सुविधा नव्याने उपलब्ध होत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुका क्रिडा संकुलात ‘टर्फफिट’च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी टर्फचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) उद्घाटन झाले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना आपल्या कौशल्यांना वावा मिळावा तसेच त्यांचे कलगुण आणखी वाढावे याकरीता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सुविधा उपलब्ध
होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका क्रिडा संकुलात टर्फफिटचे सिद्धार्थ नाबियर आणि परिर्शत भट यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळण्यासाठी टर्फचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाचा उद्घाटन सोहळा बुधवारी झाला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश शेठ, नगरसेवक आनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, तहसीलदार विजय तळेकर, टर्फफिटचे सिद्धार्थ नाबियर, प्ररिर्शत भट, जिल्हा क्रिडा अधिकारीमनिषा मानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply