पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप दक्षिण भारत सेल खारघर-तळोजा मंडल समितीच्या सदस्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. भाजप खारघर तळोजा मंडळाच्या कार्यालयात हा नियुक्तिपत्रे देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 31) झाला. भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच उत्तर रायगड जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडुरू यांच्या उपस्थितीत सदस्यांना नेमणूकपत्रे देण्यात आली. यामध्ये संयोजक रोहन शेट्टी, सहसंयोजक रामकृष्ण श्यामला शेट्टीगर, समिती सदस्य क्षाम राव, हरिता कस्तुरी, योगेश कोठारी, सी. पी. संतोष, नका मनोहर यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये श्रीनिवास कोडुरू यांनी रायगड जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा विस्तार केला आणि दक्षिण भारत सेल समितीच्या मार्गदर्शक मार्गाची रूपरेषा सांगितली. रोहन शेट्टी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले, तसेच समितीच्या ज्या सदस्यांना बैठकीस उपस्थिता राहता आले नाही त्यांनी त्यांची नियुक्तिपत्रे पक्ष कार्यालयातून घ्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले. या वेळी डी. यास. शेट्टी, एच. अमरनाथ, यमुना प्रकाशन आदी उपस्थित होते.