अलिबाग : प्रतिनिधी
पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना खुर्चीतून उठवणारे शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तालुक्यातील वडखळ येथे प्रस्तावित एमआयडीसीसंदर्भात पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या वेळी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे आमदारांच्या रांगेत प्रांताधिकारी यांच्या शेजारील खुर्चीत बसले होते. त्यावरून आमदार जयंत पाटील यांनी पोळ यांना हक्कभंग आणण्याची भाषा वापरली. याबाबत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आक्रमक भूमिका घेत जयंत पाटील यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली. गुरुवारी महाराष्ट्र संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मंदार चितळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, तसेच पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांची भेट घेवून त्यांनाही निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …