Breaking News

अलिबाग कोळीवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी भाजपचा अलिबाग नगरपरिषदेवर मोर्चा

अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग नगरपरिषदेच्या हद्दीतील कोळीवड्यात नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मगणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे गुरूवारी (दि. 16) नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
अलिबाग कोळीवाड्यात मागील काही महिने अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अलिबगा नगरपरिषदतर्फे दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. हे पाणीदेखील पिण्यास अयोग्य असते. काळीवाड्यात नियामित व पूर्ण दाबात पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथी नगरिक करीत होते. अनेक निवेदने देण्यात आली. तरीदेखील अलिबाग नगरपरिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरिकांनी गरुवारी अलिबाग नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.
भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हामोर्चा काढण्यात आला. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, भाजपा अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे आदी या मार्चात सहभागी झाले होते.
अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांची अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अलिबाग कोळीवाड्यातील पाणीपुरवठा सुरळीत कण्याची मागणी केली. हा मोर्चा शांतेेत काढण्यात आला आहे. जर येत्या सोमवारपर्यंत कोळीवाड्यातील पाणीपुरवढा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनी यावेळी दिला.

ज्या वार्डामध्ये विरोधकांची ताकद आहे तेथीली समस्या सोडविण्याकडे अलिबाग नगरपरिषद जाणूनबूजून दर्लक्ष करते. अलिबग शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे पाण्यासाठी हा मार्चा काढला आहे. इतर समस्यांसंदर्भात देखील भाजपा आवाज उठवणार आहे.
-अ‍ॅड. मेहेश मोहिते, अध्यक्ष भाजपा दक्षिण रायगड जिल्हा

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply