Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश विचारे, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा व्यक्त केला विश्वास

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी प्रकाश विचारे आणि सचिवपदी साहेबराव जाधव यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे नगरसेवक मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी अभिनंदन केले

अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची 2019 ते 2024 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी संघटनेची वार्षिक सभा झाली. या वेळी मोठ्या प्रमाणात संघाचे सदस्य हजर होते. या सभेत प्रकाश विचारे, साहेबराव जाधव, रमेश धामणे, डी. जी. मगरे, यादवराव मेश्राम, गोपाळ धारपवार, मदन नेरकर, गोपाळ रेडकर आणि सुरेन्द्र पाटील यांची कार्यकारणीवर निवड

करण्यात आली. या कार्यकारणीच्या सभेत अध्यक्षपदी प्रकाश विचारे, उपाध्यक्ष डी. जी. मगरे, सचिवपदी साहेबराव जाधव आणि खजिनदार म्हणून रमेश धामणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रकाश विचारे यांनी आम्ही संघटनेच्या माध्यमातून नवीन पनवेल मधील सामाजिक समस्या, रेल्वे, एनएमएमटी आणि रिक्षाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply