Breaking News

पनवेल परिसरात नालेसफाईची युद्धपातळी

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी व सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वीची कामे युद्धपातळी सुरू असून यातील अनेक कामे पुर्णत्वास आली आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) कळंबोली परिसरामधील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत ती लवकरात लवकत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबधित विभागाला दिले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली सेक्टर 13, 8, 10, 1ई, यांसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून ती कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यातचे निर्देश दिले. या पाहणीच्या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply