Breaking News

रायगड जिल्ह्यात पावसाच्या सरी

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. पावसाचा जोर उत्तर रायगडमध्ये जास्त होता. जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 61.04 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 116 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत सरासरी 418.26 मिमी पाऊस पडला आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 13.49 टक्के आहे. अलिबाग, मुरूड व उरण या तीन तालुक्यांमध्ये सरासरी 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.

शुक्रवारी नोंद झालेला पाऊस – अलिबाग- 116.00 मिमी, पेण-72.00 मिमी, मुरूड- 104.00 मिमी, पनवेल- 60.60 मिमी, उरण- 103.00 मिमी, कर्जत- 34.60 मिमी, खालापूर- 50.00 मिमी, माणगाव- 47.00 मिमी, रोहा- 58.00 मिमी, सुधागड-52.00 मिमी, तळा- 61.00 मिमी, महाड-22.00 मिमी, पोलादपूर- 41.00 मिमी, म्हसळा-36.00 मिमी, श्रीवर्धन- 87.00 मिमी, माथेरान- 32.40 मिमी, एकूण :  976.60 मिमी, सरासरी 61.04 मिमी

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply