सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली योगसाधना; शिक्षकांनी दिले प्रोत्साहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी बालवयातच योगासनांची मुलांना सवय लागली तर त्यांचे जीवन सुदृढ आणि निरोगी बनेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन केले. सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 21) योग दिन उत्साहात झाला. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी मुलांना योगदिनाचे महत्त्व विशद करुन योगासनांविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, सुरेंद्र ठमके, ठाकूर सर, बीना नायर, प्रिया नायर, लता बालसुब्रमनियन, शबुना शेट्टी, स्नेहल कडव यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी शाळेच्या प्रांगणात योगासने करून दाखविली व विद्यार्थ्यांना आपल्या उत्तम आरोग्यासाठी रोज योगासने करण्याचे आवाहन केले.
पनवेल : दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर मंगळवारी (दि. 21) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शारिरिक शिक्षण विभागातील शिक्षक भरत जीतेकर, अशोक पाटील, प्रकाश रिसबुड यांनी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले होते. 21 जून रोजी इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि आयुर्वेद संस्थेचे प्रतिनिधी योग दिन साजरा करण्याकरिता विद्यालयात आले होते. योग इन्स्टिट्यूटतर्फे गीता गुप्ता यांनी भिमेश शिंदे आणि शिवानी भोईर यांच्या सहाय्याने योग प्रात्यक्षिके घेतली. या वेळी विजय वेदपाठक आणि डी. बी. जोशी उपस्थित होते. पर्यवेक्षिका निरजा अदुरी यांनी सांगितले की, योगासनांमुळे मन, शरीर आणि आत्मा यांचे स्वास्थ संतुलित राहते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी योगासने केली पाहिजेत. या वर्षीची योगादिनाची थीम माणुसकीसाठी योग अशी असून मनामनात माणुसकीची जपणूक व्हावी हेच या योग दिनाचे उदिष्ट्य आहे. गेले दोन वर्षे आम्ही योग दिन ऑनलाइन साजरा केला होता, परंतु या वर्ष्ी पुन्हा एकदा हा दिवस प्रत्यक्ष साजरा करताना विद्यार्थ्यांच्या चेहेर्यावर आनंद दिसत होता, असे या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
नवीन पनवेलमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम; महापौरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील फिटनेस जिममध्ये मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 ते 9 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी योगावर व्यायामाचे महत्त्व सांगितले. रेशमी रांगपरीया यांनी उपस्थितांकडून योगा, प्राणायाम करून घेतले. फिटनेस पॉइंटचे संचालक व गार्डन हॉलीबॉलचे अध्यक्ष किसन पवार यांनी महापौर कविता चौतमल त्यांचे स्वागत केले. सेक्रेटरी श्री. घोंगडे यांनी योग गुरू रेशमी रंगपरीया त्यांचे स्वागत केले. तसेच बेटी बचाव बेटी पढावच्या उत्तर रायगड संयोगिता आरती तायडे यांचे सौ. मराठे यांनी स्वागत केले. श्री. राठोड याचा कार्यक्रम सफल करण्यात मोलाचा वाटा होता. उतम खेळाडू म्हणून श्री. कांबळे यांचा महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री. तारेकर, श्री. जाधव, स्वप्नील पवार, मारुती रोकडे, फिरोज, संजय सिंग, न्यानेस्वर ठाकूर, न्याणेस्वर जोशी (माहुली) कांबळे, माने, तारी, दिनेश, अजय, रमेश देशमुख, सिंग, कल्पेश, रितेश आणि पुरुष महिला उपस्थित होते.
खारघरमध्ये योगाभ्यास
खारघर : शाश्वत फाऊंडेशनच्या सेक्टर 19 येथील सिडको उद्यानात संस्थेतर्फे योग दिवस साजरा करण्यात आला. योगदर्शन फांऊडेशनच्या संचालिका नीरू भट यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सदस्यांनी योग अभ्यास केला. ॐकार मंत्राचा उच्चारण करून वृक्षासन, सूक्ष्म व्यायाम, भुजंगासन, अनुलोम-विलोम, प्राणायण आदी योगासने ह्या सत्रात करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष बीना गोगरी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ह्या वर्षी योग दिनाची संकल्पना ’मानवतेसाठी योग’ असल्याचे सांगितले. योगशिक्षिका नीरू भट यांनी योग व व्यायाम ह्यांचे रोजच्या जीवनातील महत्त्व यावर माहिती दिली. अन्जु पटेल यांनी प्रार्थना म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.