Breaking News

नाईक महाविद्यालयात योग दिन

नवी मुंबई : बातमीदार

कोपरखैरणे येथील नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या साह्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप नाईक, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सहयोगी प्रा. डॉ. सविता बलकर आणि योग प्रशिक्षक संदीप शिकारे, रवींद्र पष्टे अणि दिलीप गोंधळी हे उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांनसमावेत विविध योग आसनांचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार संदीप नाईक यांनी स्वस्थ जीवनामध्ये योगाचे महत्त्व विशद केले. संतुलित व सात्विक जीवन शैली आपण प्रत्येकाने अंगीकारताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग कसा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भाष्य केले. त्याचप्रमाणे भारताची प्राचीन जीवनशैली आज 21व्या शतकातदेखील मानवाला जीवन जगण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचा प्रसार केल्यामुळे व भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. तसेच डॉ. सविता ढाले यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना आजची स्पर्धात्मक व तणावपूर्ण जीवनशैली यावर मात करण्यासाठी व निरोगी आणि शांततापूर्ण आयुष्य व्यतीत करण्यासाठी योगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या वेळी एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रताप महाडिक, रा. फ. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, श्रमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक तसेच उपमुख्याध्यापक  नरेंद्र म्हात्रे, पर्यवेक्षक रवींद्र पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे प्राध्यापिका जयश्री दहाट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Check Also

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात …

Leave a Reply