Breaking News

शाळेत जाताना विद्यार्थ्यांची गैरसोय

एनएडी ते उरण बससेवा सुरू कराय; पालकांची मागणी; बस आगाराला निवेदन

उरण : बातमीदार, प्रतिनिधी

उरणमधील एन ए. डी. करंजा या शाळेतील उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एनएडी ते उरण बससेवा सुरू करा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी एसटी आगाराला निवेदन दिले आहे. उरण बस स्थानकातून सूटणार्‍या एन. ए. डी-उरण या बसने शाळेत ये-जा करीत असतात, परंतु कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे व रोड दुरूस्तीच्या कामांसाठी ही एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या बससेवेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी वाहनांतून, जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करणे त्रासदायक होत होत आहे. उरण ते एनएडी करंजा मार्ग ही बससेवा रस्ता दुरूस्तीच्या निमित्ताने तसेच कोरोनामुळे जवळपास 4 वर्षं या मार्गावर बससेवा बंदच आहे. या परिस्थितीचा फायदा खासगी वाहनांनी घेतला व वाजवीपेक्षा जास्त पैसे भरून शाळेतील विद्यार्थांना नाईलाजाने प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांसोबतच या बसने शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनाही ही बससेवा लाभदायक ठरत होती. या संदर्भात विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी एसटी बससेवा सुरू करण्याबाबत शाळेच्या पालकांकडून एनएडी उरण बससेवा शाळेच्या वेळेत सुरू व्हावी. याकरीता उरण एसटी डेपोचे महाप्रबंधक सतिश मालचे यांच्याकडे पत्रकार तृप्ती भोईर यांच्या सहकार्याने लेखी निवेदन देण्यात आले. या वेळी रोशनी कांबळे, सिमा वाल्मिकी, रेखा जाधव, ज्योती पवार, शांती सरोज, रेश्मा कदम, मंगलदास कांबळे, मंदार आसरकर, विश्वकर्मा किशन, रमेश कातकरी, मनिषा घळवट, नुर शेख, रवि आरेकर, संगिता जाधव, राजु क्षत्रिय, रोशन पासवंत, सुभाष गुलख, विलास गायकवाड, संजय गायकवाड, कालिक शेख, मेघा जाधव, आम्रपाली गायकवाड आदी पालकवर्ग उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply