Breaking News

उड्डाणपुलामुळे उरणकरांचा प्रवास होणार सुखकर

सिडकोकडून कामास गती

जेएनपीटी : प्रतिनिधी : भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या रेल्वे प्रशासनाने उरण शेवा-बोकडविरा हद्दीतील रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला गती दिली असून सदर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एकंदरीत उड्डाणपुलामुळे उरणकरांचा प्रवास सुखद आहे. रेल्वे फाटकावरून नागरिकांचा प्रवास सुखद होण्यासाठी जेएनपीटी व सिडकोने जसखार, नवघर, करळ, बोकडविरा, तसेच नवीन शेवा रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नवघर, जसखार, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याजवळील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. याबाबत सिडकोच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर हे सिडकोच्या प्रशासनाकडून सुरू असणार्‍या विकासकामांचा आढावा घेत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply