पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमधील तेरापंथ महिला मंडळाद्वारे से नो टू प्लास्टिक अभियान 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. ज्योती बाफना यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेरापंथ महिला मंडळाचे कौतुक करत या अभियानास पाठिंबा दर्शवला. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये तेरापंथ महिला मंडळाच्या माध्यमातून से नो टू प्लास्टिक हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे समर्थन करताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेरापंथ मंडळाचे हे कार्य आपल्या पंतप्रधानांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जात आहे आणि प्लास्टिकमुक्ती ही काळाची गरज असल्याचे सांगितले, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही या कार्याला पाठिंबा देत महिला मंडळाचे कौतुक केले. तेरपंथ महिला मंडळाचे मुंबईच्या ई मीडिया प्रभारी अलका मेहता, अनुव्रत समिती मुंबईचे उपाध्यक्ष विनोद बाफना, सहसंयोजक वर्षा चंडालिया, डिंपल चौधरी, दिनेश चौधरी, संजय जैन, मंजू बापना, तारा चौधरी, भारती बापना, शांता चंडालिया उपस्थित होते.