Breaking News

गाढी नदीवरील पत्री पूल कोसळला

पनवेल : वार्ताहर

करंजाडे ते भिंगारी सब स्टेशनमधील धोकादायक पत्री पुल गुरुवारी दुपारी अचानकपणे कोसळला. या वेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडताच या पत्री पुलाचा मधला भाग कोसळला, मात्र या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी व पनवेल महापालिकेचे अधिकार्‍यांनी पाहणी केली व माहिती घेतली. हा पूल दुरुस्त करण्याकरिता पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष वेधण्यात आले होते. टाटा पॉवर कंपनीमार्फत गाढी नदीवर बर्‍याच वर्षापूर्वी करंजाडे भिंगारी सब स्टेशन यांना जोडण्यासाठी पत्री पुलाची उभारणी करण्यात आली आहे, परंतु या पुलाची अतिशय दुरवस्था झाली असून तो पूल वापरण्यास अयोग्य आहे. पत्री पूल धोकादायक झाला असून तो पावसाळ्यामध्ये पुरात वाहून जाऊ शकतो व त्या ठिकाणी मोठी जीवित हानी होऊ शकते. करंजाडे येथे शहरीकरण झाले असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. येथील नागरिक पनवेल बसस्थानक, रेल्वे स्टेशनकडे जुना पनवेल उरण रस्त्याचा वापर करीत असतात, परंतु उरण नाका येथील रस्त्यावर उरण नाका येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने करंजाडे येथील नागरिक पनवेल बस स्थानक व रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून या पत्री पुलाचा वापर करतात. त्याचबरोबर पनवेलमधील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रमाण पाहता करंजाडे मधील नागरिकांना पनवेल येथे जाण्यासाठी करंजाडे-भिंगारी हा रस्ता सोयीचा असल्याने करंजाडे येथील नागरिकांकडून या पुलावापर होत होता. या पुलाच्या दुरुस्तीबाबत करंजाडे ग्रामपंचायतीच्या वतीने एक ते दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता, मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी दुपारच्या सुमारास या पुलावरून पूल ओलांडत असताना अचानकपणे पुलाचा मधला भाग कोसळला. या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. करंजाडे भिंगारी सब स्टेशनमधील पत्री पुलाची अवस्था अतिशय धोकादायक दिसून येत आहे. सर्व सामान्यांच्या सुरक्षितेसाठी ह्या पुलाचा वापर त्वरित बंद करावा, असे आमचे मत आहे. तसेच हा पूल सर्व सामान्य नागरिक वापरत असल्याने त्याची देखभाल व दुरुस्ती ही सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते व संबंधित संस्थेने हे कार्यकरणे गरजेचे असल्याचे पारेषण विभाग, टाटा पॉवर कंपनीचे प्रमुख किरण विनायक देसले यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पाठविलेल्या पत्राला उत्तर दिले आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply