पनवेल : वार्ताहर
कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व बर्याच ठिकाणी रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने सिडको व महापालिकेच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. स्त्री शक्ती फाऊंडेशन अध्यक्ष विजया चंद्रकांत कदम यांच्या पुढाकाराने शैलेश कुमार मिश्रा, चिमाजी मेंगडे, सुभाष सारतापे, बालकृष्ण म्हात्रे, अक्षय म्हात्रे, ज्ञानोबा पंडित, दत्तात्रय मोरे आदींनी सिडकोचे अधिकारी मोहिले, बनकर व चिखलकर व पालिकेचे संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सेक्टर 1 सुधागड स्कुल रिक्षा नाका, सेक्टर 2ई पोलीस ठाण्याजवळील रिक्षा नाका, रोडपाली बस डेपोजवळील रिक्षा नाका व डी मार्ट जवळील रिक्षा नाका अश्या सर्व नाक्यावरील रिक्षाचालकांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय दुचाकीवाले या खड्ड्यात ही पडलेत असे अपघात होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने सिडको आणि महापालिकेला निवेदन देण्यात आले. या वेळी अधिकार्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच बुजवून देण्याचे आश्वासन दिले.