आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलतर्फे खारघर सेक्टर 12 येथील श्री राम जानकी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आयोजित कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
या मंगलमयसमयी खारघरमधील सर्व भक्तांनी कुटुंबीयासमवेत कार्यक्रमात सहभागी होऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले व दिंड्डीचा आनंद घेतला. विद्या ठाकूर मंडळ व भक्ती संगम खारघर यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला.
या वेळी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, नेत्रा किरण पाटील, माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, मंडल सरचिटणीस कीर्ति नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, संजय घरत, सोशल मीडिया सहसंयोजक मोना आडवाणी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, सीमा खडकर, गिरीश गुप्ता, मारू काका, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर उपाध्याय, हर्षलाताई, शैलेंद्र त्रिपाठी, प्रशांत दुधम आदी उपस्थित होते.