पनवेल ः वार्ताहर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच एकनाथ शिंदे यांचे समर्थक रामदास शेवाळे यांनी कळंबोली वसाहतीमध्ये पेढे वाटून व फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.
पनवेल तालुक्यामध्येही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण शिंदेंसोबतच असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताच रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, महेश गोडसे, सुरेश देवाडिगा, ज्ञानेश्वर गावडे, विठ्ठल शिंदे, अमृत तरंगे निलेश टाकळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.