पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही अज्ञात व्यक्ती फोन करून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले. फोन करणारे व्यक्ती पंजाबी भाषेत बोलत होते आणि आमदार ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागत होते. याबाबत संशय आलेल्या नागरिकांनी त्या व्यक्तींना जाब विचारताच त्यांनी फोन बंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेबाबत माहिती देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, 3 मे रोजी अज्ञात व्यक्तींनी माझ्या नावाने पैशांची मागणी करणारे फोन आल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे सावधगिरी म्हणून मी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या नावाने इतर कोणाला फोन आल्यास मला कळवा किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper