Breaking News

आजपासून पनवेलमध्ये रंगणार प्रीमियर लीग

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये आजपासून ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. हे सामने 19 मेपर्यंत सुरू राहनार आहेत. महात्मा फुले कॉलेज, पनवेल अर्थात एएससी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या या लीगमध्ये ‘चिताज सुपर किंग्स’, ‘शिवम प्रजापती वॉरियर्स’, ‘लावाज रॉयल’, ‘विराज सुपर किंग्स’, ‘श्यामशेठ सुपर किंग्स’ आणि ‘हाय रिच सुपर स्टाईकर्स’ हे सहा संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. या लीगमधून जमा होणारा निधी खेळाडूंच्या विकासासाठी उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती देतानाच या स्पर्धेचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply